
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे वाळूच्या वादातून चौघांनी एकाला मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सोनू संजय कोळी (वय २६) हा २६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मांडळ येथील महादेव मंदिराजवळ फोन वर बोलत असताना वाळू वाहतेवेळी झालेला जुना वाद उकरून काढत योगेश हिलाल कोळी, सूरज राजेंद्र कोळी, समाधान भास्कर पाटील व अक्षय राजेंद्र कोळी यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीच्या भावाने येऊन त्याला वाचवत उपचारासाठी नेले. धुळे येथे शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ३० रोजी फिर्यादीने मारवड पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ दिनेश पाटील हे करीत आहेत.




