
सारबेटे खुर्द येथील घटना, शेजारच्या घरातही केली चोरी…
अमळनेर : बाहेरगावी गेलेल्या घरमालकाचे घर फोडून व शेजारच्या घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण दोन लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना २९ रोजी पहाटे १ ते ५ दरम्यान सारबेटे खुर्द येथे घडली.
भिमराव पुना पाटील (वय ६४ रा सारबेटे खुर्द) हे भडगावला आपल्या व्याही कडे भेटायला गेले होते. २९ रोजी सकाळी सहा वाजता त्यांचा पुतण्या नितीन पाटील यांनी फोन करून कळवले की तुमच्या घराचा आणि गावातील भालचंद्र मूलचंद पाटील यांच्या घराचा कडी कोंडा तोडलेला आहे. भीमराव पाटील यांनी घरी येऊन पाहिले असता त्यांच्या कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकून चेन , पोत ,अंगठी ,कानातले टोंगल ,किल्लु असे सोन्याचे दागिने तर २९ भार वजनाचे करदोडा , वाळा ,कमरपट्टा , देवीची मूर्ती व रोख १५ हजार रोख तर भालचंद्र मूलचंद पाटील यांच्या घरातील बाळ्या असा एकूण दोन लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी चोरून नेला.
घटनेचे वृत्त कळताच डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत, मिलिंद सोनार , विनोद संदानशीव , उदय बोरसे , लक्ष्मीकांत शिंपी यांनी भेट देऊन पंचनामा केला. सोबत ठसे तज्ज्ञांनी काही ठिकाणचे ठसे घेतले.
चोरट्यानी घरातील एक पेटी शेतात नेऊन त्यांच्यातील दागिने काढून सामान शेतात फेकुन पळून गेले. चोरटे शेतातूनच आले आणि शेतातून निघून गेले असे त्यांच्या मातीच्या पावलावरून दिसून आले.
अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३३१(४) , ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत.




