
अमळनेर (प्रतिनिधी):- शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी नागपूर येथे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या विविध समस्या, सततची नैसर्गिक संकटे व त्यामुळे आलेले आर्थिक संकट यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे, अतिवृष्टी व ओल्या दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून त्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांच्या यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कर्जमाफी या प्रमुख मागणीसाठी नागपूर येथे आंदोलन सुरू असून अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा विचार करावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी प्रा.सुभाष पाटील,राजेंद्र देसले,चंद्रशेखर भावसार,प्रताप पाटील, धनगर दला पाटील,वसंतराव पवार,मोहन भोई, प्रकाश धनगर,सुरेश पाटील,योगेश्वर पाटील व शेतकरी उपस्थित होते




