
अमळनेर – क्लासला जाते असे सांगून घरातून निघालेली शिरसाळे येथील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.
तालुक्यातील शिरसाळे येथील १८ वर्षीय तरुणी २९ रोजी सकाळी ६:३० वाजता क्लासला जाऊन येते असे सांगून घरातून निघाली. सदर तरुणी नेहमी दुपारी १२:३० वाजेपर्यंत घरी येते मात्र १:३० वाजेपर्यंत ती घरी न पोहचल्याने वडिलांनी फोन केला असता तिचा मोबाईल स्विच ऑफ होता. संध्याकाळ झाली तरी ती घरी न परतल्याने आईवडिलांनी नातेवाईकांकडे व परिसरात शोधाशोध केली मात्र कोणताही तपास न लागल्याने मुलीच्या वडिलांनी मारवड पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. पुढील तपास हेकॉ सुनील पाटील हे करीत आहेत.




