
अनधिकृतरीत्या विजेचा वापर केल्याने एकावर गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथे विनापरवानगी पोल व वायर टाकत वीजजोडणी करून अनधिकृतरीत्या विजेचा वापर केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणचे सहाय्यक अभियंता विनायक बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वावडे येथील भानुदास व्यंकट पाटील यांनी वावडे येथील मराठी हायस्कूल येथील लघुदाब वाहिनीवरून अनधिकृतपणे दोन पोल व तीन गाळे तार जोडून विद्युत वापर सुरू केला होता. सदर माहिती महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्याने त्यांनी विद्युत पुरवठा खंडित केला असून सहाय्यक अभियंता यांच्या तक्रारीवरून भानुदास व्यंकट पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ सुनील पाटील हे करीत आहेत.




