
फक्त उभ्या पिकांचे पंचनामा करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांत नाराजी…
अमळनेर:- तालुक्यात 26 ऑक्टोबर पासून सततच्या पावसाने कपाशी , मका, सोयाबीन ,बाजरी, तीळ, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे .माजी पुनर्वसन मंत्री आमदार अनिल पाटील,यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन दिले होते. तर राष्ट्रवादी शरद पवार गट,काँग्रेस,शिवसेना उबाटा, शिवसेना शिंदे गट यांनीही शासनाला निवेदन दिलेले होते.
1 नोव्हेंबर पासून कृषी सहाय्यक, तलाठी हे नुकसान ग्रस्त पिकांचा पंचनामा करणार आहेत.तरी आपापल्या परिसरातील तलाठी, कृषी सहाय्यक यांच्याशी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी संपर्क साधून आपल्या पिकांचा पंचनामा करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या आठवडा भरापासून सतत अवकाळी पाऊस सुरु आहे. यात शेतातील उभे असलेली पीके व कापणी झालेली पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी शेतात मका कापून पडलेला आहे ,त्याला कोंब फुटल्याने मका पिकांचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे .तर कापसाला झाडावरच कोंब फुटल्याने वेचणीही करता येणार नाही अशी परिस्थिती झाली आहे. मात्र यात फक्त उभ्या पिकांचाच पंचनामा करण्यात येईल यामुळे सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.त्यामुळे शेतकरी वर्गाचा मोठ्या रोषाला शासनाला सामोरे जावे लागणार आहे. तरी शासनाने शेतात उभ्या असलेल्या सर्व पिकंसोबतच शेतात कापणी झालेल्या पिकांचाही पंचनामा करण्यात यावा. अशी शेतकरी वर्गाकडून मागणी होत आहे.
कोट:-
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा :-
शासनाच्या आदेशानुसार शेतातील उभ्या असलेल्या पिकांचाच पंचनामा केला जाईल. कापणी झालेल्या किंवा साठवण करून ठेवलेल्या पिकांचा पंचनामा करण्यात येणार नाही.




