
अमळनेर : भारताचे पहिले गृहमंत्री व ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त अमळनेर पोलिस स्टेशनतर्फे “वॉक फॉर युनिटी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार , दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता महाराणा प्रताप चौकात माजी मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते क्रांतिवीर महाराणा प्रताप व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगरपरिषद मुख्याधिकारी तूषार नेरकर, प्रा. डी. डी. पाटील, प्रिंतपालसिंग बग्गा, डॉ. अनिल शिंदे, तिलोत्तमा पाटील, ऍड. तिलोत्तमा पाटील, माधुरी पाटील, आधार संस्थेच्या भारती पाटील व रेनुताई वाघमारे, मंगळग्रह मंदिर अध्यक्ष डिगंबर महाले, निरज अग्रवाल, जयवंत पाटील, ताहा बोहरी ,रियाज मौलाना, डॉ. युसूफ पटेल, मिलिंद नवसारीकर, लायन्स व रोटरी क्लब सदस्य, अंबरुषी टेकडी ग्रुप, शिवाजी गार्डन ग्रुप, पोलीस व होमगार्ड यांसह शहर व तालुक्यातील मान्यवर नागरिक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार तसेच तरुण मित्र मोठ्या संख्येने सहभागी झाले. या उपक्रमात सुमारे ३०० नागरिकांनी सहभाग नोंदवून एकतेचा संदेश दिला.लायन्स क्लब सदस्यांनी उपस्थिती नागरिकांना चहा व बिस्कीटची तर रोटरी क्लबने सरबत व चॉकलेट वाटप केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले.
मारवड पोलिस ठाण्यातर्फे ही आयोजन…
मारवड पोलिस ठाण्यातर्फे ही “वॉक फॉर युनिटी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार , दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता बस स्टँड परीसरात सपोनि जिभाऊ पाटील, पोउनि विनोद पवार, सात्री सरपंच महेंद्र शालीग्राम बोरसे,होमगार्ड पथकाचे गोपाल पाटील, पोलिस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद बोरसे व पोलिस बांधवांच्या उपस्थितीत सरदार वल्लभभाई पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पोलिस सहाय्यक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील, उपनिरीक्षक विनोद पवार,संजय पाटील, हवालदार सुनिल अगोणे, फिरोज बागवान, नरेंद्र पाटील, होमगार्ड बांधव महीला होमगार्ड भगिनी, पोलीस पाटील, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या प्रसंगी महेंद्र बोरसे म्हणाले, “राष्ट्रपुरुष सरदार पटेल यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा जो संदेश दिला, तो समाजात रूजवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे.”




