
बिना फोटोची यादी लावल्याने प्रसाद शर्मा यांची हरकत,आंदोलनाचा इशारा
अमळनेर-येथील खान्देश शिक्षण मंडळाने फेलो, पेट्रन, व्हाईस पेट्रन व सभासद यांची मतदार यादी दिनांक 31 ऑक्टोबर रोजी बिन फोटो सह प्रसिद्ध केल्याने प्रसाद शर्मा यांनी हरकत घेतली आहे.
याबाबत त्यांनी संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष व चिटणीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी फोटो सह मतदार यादी दाखविण्यात आली होती. त्या दिवशी अनेक सभासद उपस्थित होते, या अगोदर देखील आम्ही सर्व सभासदांनी आपणाकडे फोटो व रेशन कार्ड सह अर्ज सादर केले आहे. व आमची २५ वर्षा पासून फोटोसह मतदारयादी तयार करावी अशी मागणी आहे. यासंदर्भात आपण जाहीर निविदा काढून मतदारयादी अद्यावत करण्याचे काम दिले होते.तरीही आपण जुनी बिन फोटोची मतदारयादी लावली आहे. तरी अतितात्काळ फोटो सह मतदार यादी जाहीर करावी व सभासदांना न्याय द्यावा जेणेकरून त्यांचे फोटो व पत्त्यावर जाऊन निवडणुकीत उभे राहणा-या सभासदांना त्यांच्याशी संपर्क करता येईल तरी मागणीची त्वरित दखल घ्यावी अन्यथा सर्व सभासद आपल्या कार्यालयात येऊन दिनांक ०४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करतील असा इशारा सभासदाच्या वतीने फेलो प्रसाद शर्मा यांनी दिला आहे.




