
अमळनेर प्रहार जनशक्ती पक्षाकडून महसूलमंत्र्यांकडे मागणी…
अमळनेर:- तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे संतोष पाटील यांनी महसूल मंत्री यांच्याकडे केली आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहेत की, अतिवृष्टी झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांबाबत फेर विचार करून सर्व शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन, शेतकरी प्रश्नाबाबत चर्चा केली, सर्व मंडळातील शेतीचे पूर्ण पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई मिळण्याची आग्रही मागणी संतोष पाटील व मान्यवरांकडून करण्यात आली.




