
अमळनेर:- तालुक्यातील हिंगोणे बु. येथे चाळीस वर्षीय इसमाने गळफास लावून घेत जीवनयात्रा संपवल्याची घटना २ रोजी घडली आहे.
तालुक्यातील बिलखेडा येथील संदीप शालीग्राम पाटील (वय ४०) हा हिंगोणे बु. येथे सालदरकी करून उदरनिर्वाह करत होता. २ रोजी त्याने हिंगोणे बु. गाव शिवारातील नदीपात्रातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सायंकाळी ४ वाजता उघडकीस आले. गावातील लोकांच्या मदतीने त्याला उतरवून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. योगेश पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.




