
अमळनेर:- उपचारासाठी गेलेल्या एकाची दवाखान्याबाहेर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शहरात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बाहेरपुरा येथे राहणारे मोहम्मद रफिक अब्दुल रहमान तेली (वय ४०) हे १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजता शहरातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले. त्यावेळी त्यांनी त्यांची होंडा युनिकॉर्न दुचाकी (क्रमांक एमएच १९ डिजी ९१२३) ही दवाखान्याबाहेर लावली. उपचार घेतल्यानंतर ते बाहेर आले असता दुचाकी जागेवर दिसून आली नाही. तेली व त्यांच्या मित्रांनी हॉस्पिटल व आजुबाजूच्या परिसरात दुचाकीचा शोध घेतला मात्र आजपावतो दुचाकी मिळून आली नाही. तेली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ मिलिंद सोनार करीत आहेत.




