
अमळनेर:- तालुक्यातील मारवड रस्त्यावर एसटी आणि दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना १ रोजी घडली आहे.
१ रोजी सकाळी १०:४५ वाजता गयासोद्दीन बद्रोद्दीन मुजावर (वय ६८) रा. धार हे हिरो स्प्लेंडर दुचाकीने अमळनेरकडून धारकडे जात असताना पिंपऱ्या नाल्याच्या अलीकडे समोरून येणाऱ्या एसटी बस (क्रमांक एमएच २० बीएल १४३०) वरील चालकाने भरधाव वेगाने समोरून दुचाकीला धडक दिली. त्यामुळे गयासोद्दीन मुजावर याच्या डोक्याला, हाताला, पायाला व छातीला जबर दुखापत झाली. यावेळी बसचालक पळून गेला. मागून येणारे दुचाकीस्वाराचे आतेभाऊ व इतर प्रवाशांनी त्याला अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अब्दुल अलीम अब्दुल हकीम मुजावर याने दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक बापू भगवान ठाकूर याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ विनोद सोनवणे करीत आहेत.




