
अमळनेर:-केंद्र शासनाच्या P S S योजने अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी सन 2025/26 ह्या वर्षा साठी सोयाबीन खरेदीसाठी नांव नोंदणीस सुरुवात झाली आहे.
एरंडोल तालुका शेतकरी सहकारी संघ यांच्यामार्फत (अमळनेर केंद्र) बाजार समिती आवारातील देखरेख संघाच्या कार्यालयात सोयाबीन नोंदणीस दिनांक 8 नोव्हेंबर पासून नोंदणीस देखरेख संघ ऑफिस येथे प्रारंभ होत आहे.तरी शेतकरी बांधवानी याचा लाभ घ्यावा.किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2025/26 कडधान्य (सोयाबीन) खरेदी करण्यासाठी शासना कडून निर्देश प्राप्त झाले असून दि 08 नोव्हेंबर पासून ऑनलाईन नोंदणी देखरेख संघ ऑफिस अमळनेर येथे करावयाची आहे.सोयाबीन आधारभूत किंमत 5328/-असून नाव नोंदणीसाठी 2025/26ऑनलाईन सोयाबीन नोंद असलेला 7/12 उतारा व खातेउतारा,आधार कार्ड झेरॉक्स, संगणकीकृत बँक पासबुक झेरॉक्स सोबत आणणे आवश्यक आहे. तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन थंब देऊन नोंदणीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन एरंडोल संघाचे चेअरमन, मॅनेजर व संचालक मंडळ यांनी केले आहे.




