
अमळनेर:- दि. ५ नोव्हेंबर रोजी प्रा. आप्पासाहेब र. का. केले ग्रंथालयाचा वर्धापन दिन व जागतिक रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रजनीताई केले मॅडम होत्या. त्यांच्या हस्ते प्रा. आप्पासाहेब केले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर मराठी रंगभूमी दिना निमित्त अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य श्री. नाथा चितळे लिखित ‘बालनाट्यसंहिता’ चे पूजन करण्यात आले. या प्रसंगी बासरी साधक व प्रचारक योगेश पाटील यांनी सुमधुर बासरीवादन करून कार्यक्रमाला सुरेल सुरुवात दिली.
कार्यक्रमात संदीप घोरपडे, नरेंद्र निकुंभ, भाऊसाहेब देशमुख, बन्सीलाल भागवत, विवेक भांडारकर, प्रा. यू. जी. देशपांडे, सौ. स्नेहा एकतारे व सौ. अरुणा विंचूरकर यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैय्यासाहेब मगर यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. श्याम पवार यांनी केले.या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून श्यामकांत भदाणे, अजय केले, सौ. विनिता केले, प्रा. डॉ. माहेश्वरी, प्रदीप साळवी, डॉ. रविंद्र कुलकर्णी, सौ. कांचन शहा, सोमनाथ ब्रह्मे, प्रा. विजय तुंटे, डॉ. महेश पाटील, ॲड. के. व्ही. कुलकर्णी, अनिल सोनार, दिनेश नाईक, हनुमंत पाटील, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे, जगदीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास म. वा. मंडळाचे पदाधिकारी, संचालक, ग्रंथालयाचे सभासद, वाचक व रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी संस्कृती व रंगभूमीचा गौरव वृद्धिंगत केला.




