
अमळनेर:- तालुक्यातील निम येथील २५ वर्षीय तरुण २ नोव्हेंबर पासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी मारवड पोलिसांत दिली आहे.
निम येथील आनंद दिलीप कोळी (वय २५) हा २ नोव्हेंबर रोजी जळगाव येथे यात्रेनिमित्त रथ पाहून येतो असे सांगून घरातून निघाला. आईवडिलांनी शेतातून घरी आल्यावर त्याला फोन केला असता त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता. त्यानंतर रात्रीपर्यंत त्याचा फोन न लागल्याने आईवडिलांनी नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र आजपावतो त्याचा काहीच तपास न लागल्याने त्याचे वडील दिलीप कोळी यांनी मारवड पोलिस ठाणे गाठत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण करीत आहेत.




