
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे बु. येथील आदिवासी आश्रमशाळेतील बारावीचा विद्यार्थी वासुदेव पावरा याची मैदानी क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झाली आहे.
दि. ०५ नोव्हेंबर ते दि. ०७ नोव्हेंबर या दरम्यान क्रीडा व युवक सेवा संचनालय, पुणे अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, नाशिक विभाग, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक मार्फत आयोजित शासकीय विभागस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा नाशिक येथे संपन्न झाल्या. या स्पर्धामध्ये यशवंत माध्य. व उच्च माध्यमिक आदिवासी अनुदानित आश्रमशाळा पिंपळे बु. येथील इयत्ता बारावीचा विज्ञान शाखेचा खेळाडू वासुदेव भिमसिंग पावरा याने 19 वर्षाआतील मुलांच्या वयोगटात लांब उडी या खेळ प्रकारात 6.15 मी. एवढ्या अंतरावर उडी मारून प्रथम क्रमांक मिळविला. त्याची डेरवण ता-चिपळूण जि- रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तसेच 4×100 रिले (19 वर्षाआतील मुले) संघाने तृतीय क्रमांक मिळवून कास्य पदक मिळविले. सदर खेळाडूंना उच्च माध्यमिक उपक्रमशील शिक्षक स्वप्निल एच.पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा विद्या पाटील, संस्थेचे सचिव युवराज पाटील, यावल येथील प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवन पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, अमळनेर तालुका क्रीडा संयोजक सुनील वाघ, प्राथमिक मुख्याध्यापक अविनाश अहिरे, माध्यमिक मुख्याध्यापक उदय पाटील, सर्व क्षेत्रातील मान्यवर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी वासुदेवचे कौतुक करून अभिनंदन केले व त्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




