
अमळनेर :- तालुक्यातील धार रस्त्यावरील चिन्मय हॉटेल जवळ दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील अंतुर्ली येथे आश्रमशाळेत शिपाई असलेले पवन सुभाष पाटील (वय 39) रा. प्रताप मिल कंपाऊंड, अमळनेर हे दररोज अंतुर्ली ते अमळनेर नोकरीनिमित्त अपडाऊन करत असतात. २३ रोजी पवन पाटील हे त्यांच्या मूळ गावी अंतुर्ली येथे ओला स्कूटरने जात असताना संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास धार रस्त्यावरील चिन्मय हॉटेल जवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यावेळी बाजार समिती संचालक सचिन बाळू पाटील यांनी त्यास अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांचे वडील सुभाष पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात वाहकचालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई हे करीत आहेत.




