
अमळनेर:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे विक्रीसाठी नोंदणीस सुरुवात करण्यात आली आहे.
बाजार समितीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी सभापती अशोक पाटील व सचिन उन्मेष राठोड यांच्यावतीने राज्य कृषी पणन मंडळाकडे व नाफेड कडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यामुळे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत किमान आधारभूत दरानुसार खरीप हंगाम २०२५-२६ करिता सोयाबीन पिकासाठी खरेदी केंद्र मंजूर झाल्याचे कृषी पणन मंडळाच्या उपसरव्यवस्थापक यांचे पत्र ११ रोजी बाजार समितीस प्राप्त झाले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठी सोय झाली असून बाजार समितीतच किमान आधारभूत किंमतीनुसार सोयाबीन विक्री करता येणार आहे.




