
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे कै. रावसाहेब मोतीराम माधवराव पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्याहस्ते संपन्न झाले.

ग्रामविकास विकास शिक्षण मंडळाचे संस्थापक, व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पद भूषवलेले कै. रावसाहेब मोतीराम माधवराव पाटील हे परिसरात शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जातात. १२ रोजी त्यांच्या प्रतिमेचे अनावरण माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, उमाकांत साळुंखे, सुनील साळुंखे, पंकज लोहार, अरुण पाटील, आनंदकिशोर चौधरी, दर्शन सुर्वे, प्रणव साळुंखे, रा. कॉ. सोशल मीडिया उपजिल्हाध्यक्ष करण साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.




