
अमळनेर :- दहिवद- सोनखेडी रस्त्यावरील सब स्टेशन जवळ जखमी अवस्थेत ५० वर्षीय इसमाचा मृतदेह १२ रोजी रात्री आढळून आला असून त्याचे मृत्यूचे कारण समजू शकले नाही.याबाबत अमळनेर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

हेमंत रविंद्र पाटील रा.सोनखेडी ता. अमळनेर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दि.१२ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास दहिवद-सोनखेडी रस्त्यावरील सब स्टेशन जवळ रविंद्र गोकुळ पाटील वय ५० रा.सोनखेडी ता.अमळनेर हा रस्त्यावर संशयित रित्या मृत अवस्थेत पडलेला होता.त्याच्या तोंड,डोके व नाकातून रक्त निघून कोणतीही हालचाल न करता रस्त्यावर पडलेला दिसल्याने त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मृत घोषित केले. याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत रविंद्र पाटील यांचा मृत्यू नेमका वाहनाने धडक दिल्याने झाला की काही घातपात आहे.याचा शोध पोलीस घेत आहेत




