
अमळनेर:- शहरातील ड्रॉइंग क्लासला गेलेल्या १७ वर्षीय मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद अमळनेर पोलिसात दाखल करण्यात आली आहे.

शहरातील सतरा वर्षीय मुलगी 12 वीत शिकत असून दिनांक 12 रोजी दुपारी साडेचार वाजता ड्रॉइंग क्लासला जाते म्हणून सदर मुलगी घरातून निघाली. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेपर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या आईने फोन केला असता ती फोन कट करत होती. नातेवाईकांसह आईने क्लासला जाऊन तपास केला असता सदर मुलगी क्लास सुटल्यावर सहा वाजताच निघून गेल्याचे सांगण्यात आले. नंतर तिचा फोन ही बंद झाला आणि नातेवाईकांकडे तपास केला असता सदर मुलगी मिळून आली नाही. त्यामुळे मुलीचे आईने अमळनेर पोलिसात मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळून नेल्याचे नमूद करत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि रवींद्र पिंगळे हे करीत आहेत.




