
अमळनेर(प्रतिनिधी):- येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी १४ रोजी सदस्यपदासाठी २९ अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत सदस्य पदासाठी एकूण ५२ अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी १४ रोजी १ अर्ज दाखल झाला आहे.

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
शुक्रवारी सदस्य पदासाठी १९ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले,यात अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीकडून कैलास नामदेव पाटील (प्रभाग – १), शेख शबनुर बी सलीम (प्रभाग ५),नंदा संदानशिव,चेतन राजपूत (प्रभाग ९),लता पाटील (प्रभाग १४),प्रताप शिंपी (प्रभाग १६) यांनी अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादी काँग्रेस कडून कैलास नामदेव पाटील (प्रभाग १), प्रवीण गंगाराम पाटील (प्रभाग ७),शेख शबनुर बी शफी (प्रभाग ५),चेतन राजपूत (प्रभाग ९),लता पाटील (प्रभाग १४), दाखल केले तर
शिवसेनेकडून गायत्री पाटील (प्रभाग २),नीता कांबळे (प्रभाग ४),परेश उदेवाल(प्रभाग ४),कल्पना शर्मा (प्रभाग ९) तर भारतीय जनता पार्टीकडून नूतन पाटील (प्रभाग २) यांनी अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्रशांत पाटील (प्रभाग १५) यांनी अर्ज दाखल केला.
तर अपक्ष म्हणून ,कैलास पाटील (प्रभाग १),संदीप सैंदाणे (प्रभाग २),नूतन पाटील (प्रभाग २),गायत्री पाटील (प्रभाग २) ,जिजाबाई संदानशिव (प्रभाग ४), पाटील प्रवीण गंगाराम (प्रभाग ७),परेश उदेवाल(प्रभाग ४),शेख खुबाबी शेख शफी (प्रभाग ४), ज्ञानेश्वर पाटील (प्रभाग ११), शेख सलीम फत्तू (प्रभाग १३),प्रताप शिंपी (प्रभाग १६),रुपाली भोई (प्रभाग १८) यांनी देखील अर्ज दाखल केले.




