
अमळनेर:- तालुक्यातील एकलहरे शेत शिवारातून अज्ञात चोरट्याने ३८०० मीटर लांबीची विद्युत तार चोरून नेल्याची घटना १० रोजी उघडकीस आली आहे.

याप्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रमोद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेतातील विजेची तार चोरून नेल्याबाबत एकलहरे येथील शेतकऱ्याचा फोन आल्याने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिले असता २१ गाळ्यावरील थ्रीफेज लाइनवरील ३८०० मीटर लांबीची व २१ हजार रुपये किमतीची अल्युमिनियमची विद्युत तार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे दिसून आले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहेत.




