
अमळनेर:- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान बाल विवाह मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी जस्ट राईट फॉर चिल्ड्रन अंतर्गत आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ग्रुप ग्रामपंचायत चिमणपुरी पिंपळे येथे कॅण्डल मार्च व प्रभात फेरी काढून जन जागृती करण्यात आली.

समाजात आज ४० टक्के बालविवाह होत आहे. बालविवाहामुळे माता मृत्यू, बालमृत्यू, गर्भपात अशा समाजाच्या काही समस्या निर्माण होतात. परिणामी कमकुवत पिढीसारखी संकटेही राष्ट्रासमोर उभी राहतात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी बालविवाह थांबवण्यात यावा, असे आवाहन करत पिंपळे येथील कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयात आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे बालविवाह मुक्त भारताची शपथ घेण्यात आली. शाळेमार्फत गावात कॅन्डल मार्च व प्रभात फेरीत काढण्यात आली. समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सागर कोळी यांच्या पथकाने पथनाट्य सादर करत जनजागृती केली याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, ग्रुप ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी, प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील, उपसरपंच मीना पाटील, सदस्य जयश्री पाटील, मुख्याध्यापक सी एन पाटील, उपशिक्षक डी बी पाटील, सर्व शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका निर्मला चौधरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते




