
अमळनेर: तालुक्यातील मारवड येथील हर्षिता सुनील साळुंखे हिने विभागीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक स्पेअर प्रकारात गोल्ड मेडल पटकावले आहे.

मारवड येथील रहिवासी व महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेल्या सुनील साळुंखे यांची सुकन्या असलेली हर्षिता सुनिल साळुंखे ही काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव येथे शिक्षण घेत आहे. 19 वर्षे आतील योगासन आर्टिस्टिक स्पेअर जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत यश मिळवून १० रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत विभागीय स्तरीय योग स्पर्धेत तिने व सिमरन बारी ह्या विद्यार्थिनीसोबत गोल्ड मेडल पटकावले. त्यांना डॉ. अनिता पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले असून दोघांची आता राज्यस्तरीय आर्टिस्टिक स्पेअर स्पर्धेसाठी निवड झाली असून तिच्या यशाबद्दल मारवड परिसरातून अभिनंदन करण्यात येत असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.




