
शहराच्या कानाकोपऱ्यात सुपरिचित असलेले जितू ठाकूर बनले निवडणुकीतील प्रबळ दावेदार…
अमळनेर – आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात उमेदवारांच्या चर्चेला वेग आला असताना नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र उर्फ जितू ठाकूर यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे. स्थानिक नागरिकांसह सर्व राजकीय नेत्यांमधून जितेंद्र ठाकूर यांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष मानली जात आहे.

शहरातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर पत्रकारितेच्या माध्यमातून काम करणारा, नेहमीच लोकांमध्ये राहून मदत करणारा, स्पष्टवक्ता आणि कोरी पाटी असलेला चेहरा म्हणून जितू ठाकूर यांना ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते-विकास, पाणीपुरवठा, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम याबाबत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळेच “शहराला काम करणारा नगराध्यक्ष हवा असेल, तर जितू ठाकूर यांनाच संधी”, असे मत नागरिक मोठ्या प्रमाणात व्यक्त करत आहेत.
विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग, युवकांना प्रोत्साहन, शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आखलेले धोरण यामुळे त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. विशेष म्हणजे पक्ष-पातळीवरील नेत्यांसुद्धा ठाकूर यांच्या संघटन कौशल्याचे आणि लोकांशी घट्ट नाते असण्याचे कौतुक करत असून, त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरातील गल्ल्या–बोळांपासून सामाजिक माध्यमांपर्यंत ठाकूर यांच्याविषयीचा सकारात्मक माहोल निर्माण झाला आहे. यामुळे आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जितेंद्र उर्फ ‘जितू’ ठाकूर हे एक प्रभावी, लोकप्रिय आणि स्पर्धेत आघाडीचे उमेदवार समोर आले आहेत.




