
नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार जितेंद्र ठाकूर यांनी जाहीर केले विकासाचे व्हिजन…
अमळनेर:- आगामी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी आपली अमळनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवार करत असल्याचे सांगत आपला संकल्पनामा जाहीर केला आहे.

▪️ दररोज पाणीपुरवठा- टंचाई होणार दूर…
अमळनेरात प्रत्येक घराला दररोज पाणी मिळेल, यासाठी स्वतंत्र जलपुरवठा योजना आणि पाणी पुनर्वापर प्रणाली तत्काळ प्रभावाने लागू करणार तसेच पाणी गळती आणि पाईपलाईन दुरुस्तीसाठी तत्काळ प्रतिसाद पथक तयार करून सर्वच प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवणार…
▪️ प्रत्येक प्रभागात मुलांसाठी ग्रीन पार्क तर वृद्धांसाठी ओपन जीम…
प्रत्येक प्रभागात मुलांसाठी सुंदर, सुरक्षित ग्रीन पार्क. खेळ, शिक्षण आणि आनंद यांचं सुंदर संगम असलेली उद्याने उभारण्यात येणार. प्रत्येक वयोगटासाठी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन एअर व्यायाम सुविधा. ज्येष्ठ नागरिकांसाठी “स्नेहबंध” दिवस केंद्र उभारणार…
▪️ शहरभर मूलभूत सुविधा पुरवणार…
दिवसरात्र प्रकाशमान रस्ते, स्वच्छ, नाली व्यवस्था, नियमित कचरा संकलन व “स्वच्छ अमळनेर” मोहीम राबवणार.
शहरातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी नगरपालिका शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम उभारणार. तसेच नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करुन प्रभागात रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देणार.
▪️नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर…
ई-नगरपालिका अ ॅपद्वारे कर, परवाने साठी यंत्रण तयार करणार. ऑनलाईन तक्रार करण्याची प्रणाली तयार करून नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीवर २४ तासांत प्रतिसाद देणार
▪️ शहराची सुरक्षा भक्कम करणार …
शहरातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवून महिला व मुलींसाठी सुरक्षित वातावरण तयार करणार. सीसीटीव्ही कॅमेरे बसवून शहरातील चोऱ्यांचे प्रमाण कमी करणार.
यांसह झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून सर्वांसाठी निवारा उभारणार, तसेच प्रत्येक प्रभागात सांस्कृतिक हॉल व समाज मंदिरांची उभारणी करणार.
स्वच्छ, समृद्ध, सुरक्षित व आत्मनिर्भर शहराची उभारणी करण्यासाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करणाऱ्या जितेंद्र ठाकूर यांना शहरातून मतदारांची भक्कम साथ लाभत आहे.




