
अमळनेर:- येथील पालिकेच्या निवडणुकीसाठी १६ रोजी सदस्य पदासाठी १०५ अर्ज दाखल झाले असून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी ५ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज दुपारपर्यंत एबी फॉर्मचे वाटप होणार असून संध्याकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

नगरसेवक पदासाठी आतापर्यंत २२४ तर नगराध्यक्ष पदासाठी एकुण १३ अर्ज दाखल झाले आहेत. त्यात काल रेखा मधुकर सोनवणे १ अर्ज, गुणवंत सुरेश वाघ एक अर्ज, उमाकांत सुकलाल ठाकूर दोन अर्ज, योगिता आकाश पवार यांचा एक अर्ज असे नगराध्यक्ष पदासाठी ५ अर्ज दाखल केले आहेत.




