
अमळनेर : तालुक्यातील दहिवद गावाच्या गावठाण जागेतील गोठ्यामधून चार जणांची नऊ गुरे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १५ रोजी रात्री ते १६ रोजी सकाळ दरम्यान घडली.

दहिवद येथून गोरख चिंधु माळी यांच्या ३० हजार रुपये किमतीच्या दोन गायी व दोन गोऱ्हे , चंद्रकांत चिंधु माळी यांची १० हजार रुपये किमतीची एक गाय , बाजीराव आत्माराम पाटील यांची १५ हजार रुपये किमतीची एक गाय व एक गोऱ्हा , तर ज्ञानेश्वर चंद्रभान गोसावी यांची १५ हजार रुपये किमतीची दोन गुरे अशी एकूण ७० हजार रुपये किमतीची नऊ गुरे अज्ञात चोरट्याने चोरून नेली. गोरख माळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.




