
अमळनेर : नगरपालिका निवडणूकीसाठी ४०७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यात ३१४ अर्ज वैध ठरले होते तर ९३ अर्ज अवैध ठरले आहेत. छाननी नंतर नगराध्यक्ष पदासाठी १५ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी १९१ उमेदवार रिंगणात आहेत. माघार झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

पालिका निवडणूक साठी निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड , सहाय्यक निवडणूक अधिकारी रुपेशकुमार सुराणा , गणेश शिंदे यांनी उमेदवारी अर्जांची छाननी केली. नगराध्यक्ष पदासाठी १५ उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात आहेत. तर नगरसेवक पदासाठी ३७७ अर्ज दाखल केले होते.त्यापैकी ९३ उमेदवार छाननीत बाद झाले आणि एकापेक्षा जास्त अर्ज काढण्यात आले त्यानंतर १९१ उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात आहेत.
अनेक उमेदवारांनी पक्षाचे अर्ज दाखल केले होते मात्र ते पक्षाचा ए बी फॉर्म देऊ शकले नाहीत. काही उमेदवार सूचक, अनुमोदक यांच्या सह्या नव्हत्या. काहींची कागदपत्रे अपूर्ण होती असे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.२१ नोव्हेंबर पर्यंत होणाऱ्या माघारीनंतर अमळनेर पालिका निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.




