
शहरातील मतदारांमध्ये मतप्रवाह, जितेंद्र ठाकूर यांना मिळतोय उदंड प्रतिसाद…
अमळनेर : आगामी नगरपरिषद निवडणुकीची राजकीय हवा चांगलीच तापली असून शहर विकास आघाडी व शिंदे सेना यांच्यात मुख्य सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत. १७ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर शहरभर राजकारणाला नवा वेग मिळाला आहे. उमेदवार कोण? त्यांची पार्श्वभूमी काय? शहराच्या भविष्यासाठी कोण अधिक योग्य? यावर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

शहरातील मतदारांमध्ये एक ठोस मागणी जोर धरताना दिसत असून “नगराध्यक्ष स्थानिकच असावा, शहराची समस्यांची खरी जाण असलेला, इथल्या जनतेत मिसळणारा आणि ओळखीचा चेहरा असावा.” बाहेरून येणारे किंवा निवडणुकीपुर्वी दिसणारे नेते नकोत, तर कायम शहरातच राहणारे आणि काम करणारे नेतृत्व हवे, असा आवाज अनेक ठिकाणी उमटतो आहे.
शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर हे स्थानिक रहिवासी असल्याने तसेच गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून कार्यरत असल्याने शहराच्या प्रत्येक भागातील समस्या जाणून आहेत. त्यांना शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, व्यापारी वातावरणाची चांगली जाण असून त्यामुळे जितेंद्र ठाकूर यांना प्रचारादरम्यान मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
शहरातील समस्या समजून घेणारा, त्यावर ठोस पावले उचलणारा आणि त्यासाठी प्रशासनासोबत काटेकोरपणे पाठपुरावा करणारा नेता शहराला हवा आहे, असे मत शहरातील व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला गट आणि तरुण मतदारांकडून व्यक्त केले जात असून जितेंद्र ठाकूर यांना मतदारांची पसंती मिळत आहे.




