
अमळनेर:- अमळनेर चोपडा रस्त्यावरील दमोता माता स्टोन क्रशर येथे चारचाकी वाहनाच्या झालेल्या अपघात प्रकरणी चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिद्धी विनायक कॉलनी भागातील रहिवासी गिरीश पाटील यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की,त्यांचा मुलगा शुभम हा २० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.०० वाजता काही कामानिमित त्यांची स्कॉर्पिओ गाडी (एम एच १९ ए.एस. ७००२) खडी क्रशर कारखान्यावर घेऊन गेला होता, तेव्हा तेथील मजूर संदीप पाटील याने लगेच येतो असे सांगून शुभम कडून चारचाकी वाहन घेऊन गेला, तेव्हा त्याच्या सोबत शालक विपुल पाटील होता.
भरधाव वेगाने गाडी घेऊन गेला असता स्टोन क्रशर आवारातील मुतारीला त्याने जोरदार धडक दिली यात त्याच्या शालक च्या हाताला दुखापत झाली सोबतच चारचाकी वाहनाचे ६ लाख ९० हजारांचे नुकसान झाले.
गाडीच्या नुकसानीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ. गणेश पाटील करत आहेत.




