
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ व शिरूड येथील शाळेत रोटरी क्लब तर्फे दहावीच्या विद्यार्थ्याना मोफत शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या ऍप चे वाटप करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता वाढावी , प्रश्न कसे सोडवावेत , अचूक आणि शुद्ध मांडणी कशी करावी याचे ज्ञान अवगत होण्यासाठी प्रत्येकी १५०० रुपयांचे ‘आयडियल स्टेडी’ हे डिजिटल ऍप मोफत देण्यात आले. मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय तसेच शिरूड येथील व्ही झेड पाटील माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना हे ऍप देण्यात आले. त्याचप्रमाणे आदर्श नागरिक घडावेत म्हणून ‘चांगला माणूस बनण्याचा संकल्प’ या पुस्तकांचे देखील वाटप करण्यात आले. या ऍप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा परीक्षेचा सराव चांगला होणार आहे. मराठी ,इंग्रजी आणि सेमी इंग्रजी अशा तिन्ही प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबर ग्रामीण विद्यार्थी आणण्यासाठी रोटरी क्लबने हा उपक्रम राबवला आहे.
हे ऍप विद्यार्थ्यांना मोफत देण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष देवेंद्र कोठारी , सचिव आशिष चौधरी , प्रोजेक्ट चेअरमन अभिजीत भांडारकर , किर्तीकुमार कोठारी , राजेश बेदमुथा , प्रदीप अग्रवाल यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी अशोक सूर्यवंशी , प्रभुदास पाटील ,संजय पाटील ,राजेंद्र पाटील , सुषमा सोनवणे , सीमा मोरे ,शीतल चव्हाण , सीमा पाटील , राहुल पाटील ,शिरूडचे मुख्याध्यापक अनिल सूर्यवंशी , भुषण सोनवणे , जाधव सर हजर होते. रोटरी क्लबच्या या स्तुत्य उपक्रमाचे अनेक पालकांनी कौतुक केले आहे.




