
अमळनेर – येथील पत्रकार उमेश प्रतापराव काटे यांना ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट पदाधिकारी ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘राजस्थान’चे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा पुरस्कार काटे यांना देण्यात आला.

पंढरपूर येथे झालेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या राज्य शिखर अधिवेशनात हे पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी उद्योजक राणा सूर्यवंशी, इस्कॉन प्रकल्प प्रमुख प. पू. प्रल्हाद दास, अमेरिकेचे श्रीकृष्ण चैतन्य महाराज, संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महासचिव दिव्या भोसले, राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश सरचिटणीस डॉ.डिगंबर महाले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातील केवळ पाच तालुकाध्यक्षांना हा पुरस्कार देण्यात आला. नाशिक विभागातून उमेश काटे हे एकमेव आहेत. दरम्यान अमळनेर येथे संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, गरजू – गरिबांना वस्तू वाटप, उत्कृष्ट गणेश मंडळाचा सन्मान, विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले होते. तसेच अमळनेर येथे नुकतेच संघटनेचे ‘राज्यस्तरीय केडर कॅम्प’ यशस्वीरित्या पूर्ण केले होते. या सर्व कामाची दखल घेत राज्यस्तरीय निवड समितीने उमेश काटे यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती. त्यांच्या या निवडीबद्दल माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, नवलभाऊ प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अनिकेत विजय पाटील, मार्गदर्शिका शिलाताई पाटील यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.




