
अमळनेर : तालुक्यातील सोनखेडी , जानवे , लडगाव, तांबेपुरा येथे पोलिसांनी छापे टाकून गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त केल्या आहेत. चार आरोपीकडून १ लाख ७२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गावठी दारू भट्ट्याविरुद्ध कडक मोहीम राबवणे सुरू केले आहे. त्यांनी स्वतःसह पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्या नेतृत्वात हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे ,संतोष नागरे , सुनील जाधव ,सिद्धांत शिसोदे , सुनील तेली , मिलिंद सोनार ,प्रशांत पाटील , उज्वलकुमार म्हस्के ,नितीन मनोरे , विजय भोई , राहुल पाटील , सागर साळुंखे , गणेश पाटील ,भूषण परदेशी , श्यामल पारधी ,चरणदास पाटील यांच्या पथकाला विविध ठिकाणी धाडी टाकायला पाठवले
पोलिसांनी तांबेपुरा येथे हनुमान मंदिराच्या मागे संदीपसिंग शीख यांच्याकडे छापा टाकून ३४ हजार ५०० रुपयांचे कच्चे रसायन , गावठी दारू , लडगाव येथे दीपक मोरचंद पवार यांच्याकडे ४० हजार ८०० रुपयांचे रसायन ,दारू , वना रामा भिल रा सोनखेडी यांच्याकडे ३५ हजार रुपयांचे रसायन ,दारू , सुनील गुलाब भिल यांच्याकडे ३० हजार ४०० रुपयांचे रसायन , दारू , जानवे येथे रवींद्र त्र्यम्बक भिल यांच्याकडे ३१ हजार ४०० रुपयांचे रसायन व दारू असे एकूण १८०० लिटर कच्चे रसायन , ३९० लिटर पक्के रसायन आणि ५६ लिटर गावठी दारू असा १लाख ७२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. चारही आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला तसेच सर्व हात भट्ट्यांची तोडफोड करून उध्वस्त करण्यात आल्या. वेगवेगळ्या गुन्ह्यात तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील ,हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील आणि काशिनाथ पाटील करीत आहेत




