
अमळनेर : नगर परिषद निवडणूक २०२५च्या अनुषंगाने निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत १०४ पात्र कर्मचाऱ्यांपैकी तब्बल १०१ कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावला.




