
दोन गटात दगडफेक, पोलीस त्वरित हजर झाल्याने परिस्थिती नियंत्रणात…
अमळनेर : मतदान शांततेत झाले असले तरी उमेदवारांच्या नातेवाईकांच्या भांडणातून दोन गटात दगडफेक झाल्याची घटना ३ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गांधलीपुरा भागात घडली. वेळीच पोलीस हजर झाल्याने परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आली.
गांधलीपुरा भागातील प्रभाग सहा मध्ये शबनूरबी सलीम शेख व सैय्यद मिसबाह मनाजीर अली हे पालिका निवडणुकीचे उमेदवार होते. शबनूरबी शेख यांचे पती सलीम टोपी यांचे नातेवाईक रफीक मेंटल आणि मिसबाह सैय्यद यांचे पती आबीद मिस्त्री यांचे नातेवाईक अख्तर शेख मुजाहिर यांच्यात सुभाष चौकात वादविवाद झाले. त्यांनंतर ते गांधलीपुरा भागात आल्यानन्तर दोघांच्या गटातील लोक गांधलीपुरा भागात एकमेकांच्या समोर आल्यानन्तर किरकोळ स्वरूपात दगडफेक झाली. त्यात एक जण किरकोळ जखमी झाला. सुदैवाने कोणतीच हानी झाली नाही.
घटनेचे वृत्त कळताच डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , एपीआय रवींद्र पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज यांच्यासह आरसिपी प्लाटून हजर झाले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.




