
अमळनेर : येथील ढेकूसीम रोड व पिंपळे रोडवरील वै. हभप मोठे बाबा मंदिर विश्वस्त मंडळातर्फे गुरुवर्य मोठे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त ७ डिसेंबर ते १४ डिसेंबर पर्यंत अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण , दुपारी ४ ते ५ प्रवचन सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० हरी कीर्तन होणार आहे. ७ रोजी हभप निवृत्ती पाटील महाराज यांचे , ८ रोजी हभप पोपटराव महाराज , ९ रोजी हभप महेश महाराज , १० रोजी हभप मुकुंदा महाराज ,११ रोजी हभप हरिदास महाराज , १२ रोजी हभप परमेश्वर महाराज , १३ रोजी हभप गोविंद महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. १३ रोजी पालखीव दिंडी सोहळा होणार आहे.
हभप गुलाबराब महाराज लोण बुद्रुक , हभप सी एस पाटील धरणगाव हभप विवेक शिसोदे डांगरी , हभप गोकुळ महाराज पिंपळी, हभप कैलास महाराज टाकरखेडा , हभप सत्यवान महाराज देवळी आणि हभप गजानन महाराज आळंदी यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.




