
साइड पट्ट्या भरल्याच नसल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, ठेकेदाराचा मनमानी कारभार
अमळनेर: तालुक्यातील मंगरूळ ते पिंपळे रस्त्याची दुरावस्था झाली असून नवीन झालेल्या रस्त्यावर लगेच खड्डे पडल्याने व साईट पट्ट्या सहा ते सात महिने झाले अद्याप भरलेल्या नाहीत कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहे.
मंगरुळ ते पिंपळे रस्त्याचे काम अपूर्ण असून काम सुरूच असतानाच नवीन रस्त्यावरच साईट पट्ट्या भरल्या नसल्याने समोरासमोरून गाड्या पास होण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. तसेच ठेकेदाराने साइड पट्ट्या भरल्या नाहीत त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच काम बाकी असलेल्या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम मंजूर असून देखील ठेकेदार एक किलोमीटर रस्ता बनवत नाही. दुचाकीस्वारांसह मोठ्या वाहनधारकांना खड्डे टाळताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक किरकोळ अपघात याठिकाणी घडले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मनमानी कारभार करणाऱ्या ठेकेदाराला समज देऊन गुणवत्तापूर्ण काम करून घ्यावे अशी मागणी होत आहे




