
दोघांविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर : येथील गांधलीपुरा भागातील दोघांनी एकाला चाकु दाखवून दुसऱ्याच्या डोक्यात दरवाजाची चौकट मारून जखमी केल्याची घटना ३ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
कदिरअली नुरअली सैय्यद याने फिर्याद दिली की ३ रोजज दुपारी दोन वाजता ते सलीम टोपी यांच्या कार्यालयात डॉ आंबेडकर चौकात बसलेले असतांना कैसर अली आबीद अली व अजमल अली शौकत अली उर्फ बल्ली दोन्ही रा दर्गाअली मोहल्ला हे आले व त्यांनी चाकु दाखवून शिवीगाळ केली. कादिर अली त्यानाशीविगला का करता असे विचारु लागल्याने त्यांनी इरफान शेख शफीयोद्दीन व अजहर शेख रफीयोद्दीन यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याचवेळी अजमल अली याने काचेच्या दरवाजाची चौकट उचलून अजहर च्या डोक्यात मारून जखमी केले आणि अगर हमारे नांद मे लगे तो काट डालेंगे अशी धमकी दिली. जखमीला धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत दोन्ही आरोपींविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




