
अमळनेर : धावत्या व्हॅन ला अचानक आग लागल्याची घटना ४ रोजी सायंकाळी ७:२० वाजता पारोळा रस्त्यावर खोकरपाट फाट्यावर घडली. वेळीच अग्निशमनदल पोहचल्याने अनर्थ टळला.
सायंकाळी पारोळा रस्त्यावर एम पी ०९ बी ए ८८६१ या वाहनाला अचानक आग लागली. तातडीने अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी व फायरमन दिनेश बिऱ्हाडे , आकाश संदानशीव ,जफर पठाण यांना अग्निशमन बंब घेऊन पाठवले. वाहनातील चालक आणि प्रवासी तातडीने खाली उतरले. अग्निशमन दलाने तातडीने आग नियंत्रणात आणली. वाहन गॅस वर चालत असल्याने अचानक आग लागताच वाहने रस्त्यावरच थांबली होती.




