
अमळनेर:-भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक 6 डिसेंबर रोजी प्रबुद्ध विहार येथून कॅन्डल रॅलीचे आयोजन सायंकाळी 5.30 वाजता करण्यात आले आहे.
सदर रॅली महाराणा प्रताप चौक,एस टी स्टँड,संविधान चौक,बालेमिया,दगडी दरवाजा,पाच कंदील मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन करून रॅलीचा समारोप होईल.तरी सर्वानी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सोबत कँडल आणून रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव,पश्चिम महिला व पुरुष विभाग अमळनेर अंतर्गत प्रबुद्ध विहार यांनी केले आहे.




