
अमळनेर : तालुक्यातील कुऱ्हे खुर्द येथे दत्त जयंती दिनानिमित्त सरला फाउंडेशन तर्फे मोफत डोळे तपासणी व चष्मा वाटप शिबीर संपन्न झाले. ४०२ जणांनी शिबिराचा लाभ घेतला १५० जणांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंद सिंह ठोके (राजपुत करणी सेना, महाराष्ट्र व सरला फाउंडेशनचे अध्यक्ष) अध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, यांच्या हस्ते शिबिराच्या उद्घाटन करण्यात आले या शिबिरात ४०२ लोकांनी लाभ घेतला, यापैकी १८४ लोकांना चष्मा वाटप करण्यात आले, तसेच ५० लोकांना औषधी देण्यात आल्या,६२ लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन नाशिक येथील तुलसी हॉस्पिटल मध्ये करण्यात येणार आहे, ५८ वेगवेगळ्या चष्मांचा आवश्यकता आहे तसेच ५० लोकांना डोळ्यांच्या कोणताही त्रास नव्हता, अशा पद्धतीने शिबिराचा लोकांनी लाभ घेतला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरला फाउंडेशनच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल कुर्हे खुर्द गावातील नागरिकांनी गावात प्रथमच होत असलेल्या मोफत शिबिराबद्दल सरला फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष सुर्यवंशी यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला म्हणून प्रमुख पाहुणे आनंद सिंग ठोके राजपूत, सुभाष सूर्यवंशी (सरला फाउंडेशन अध्यक्ष ठाणे,)तसेच उपसरपंच कुर्हे बु. विजयसिंग पाटील, सचिव गुलाब सुभाष पाटील,, मुख्याध्यापक शिक्षक वृंद जि प शाळा कुर्हे खुर्द,समाधान पाटील , विनोद पाटील, किशोर चिकाटे, संजू नाईक, रावसाहेब धनगर, विकी पाटील, यांच्या सह महीला व ग्रामस्थ कुर्हे खुर्द.उपस्थीत होते.




