
अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाचा विदयार्थी तसेच जयहिंद व्यायामशाळेचा पठ्ठा पवन प्रताप शिंपी याने आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत अंतिम सामन्यात जामनेर च्या कुस्तीपटूवर विजय मिळवत राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
धुळे येथील क्रीडा संकुलात ७ रोजी आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. पवन शिंपी याने ७९ किलो वजन गटात विजय मिळवला. तो एकूण तीन सामने खेळला. पवन याला प्रताप शिंपी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच खानदेश शिकधन मंडळाच्या संचालकांनी अभिनंदन केले आहे. पुढील महिन्यात तो चंदीगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होणार आहे.




