
आकाश माहेश्वरी यांचे अध्यक्षांना पत्र
अमळनेर:-येथील खान्देश शिक्षण मंडळ निवडणूकीत मतदानासाठी नोटाचाही पर्याय असावा जेणेकरून मतदारास कोणताही उमेदवार पसंत नसल्यास तो नोटाला मतदान करू शकेल अशी सूचना करणारे पत्र आकाश वसंत माहेश्वरी यांनी निवडणूक समितीचे अध्यक्ष, तसेच संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांना दिले आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी व भविष्यात संस्थेचे कामकाज सुरळीत व्हावे या उद्देशाने त्यांनी खालील प्रमाणे सूचना केल्या आहेत.
यात मतदान पत्रिकेमध्ये नोटाचा पर्याय द्यावा,तसेच संचालक पदासाठी कमीत कमी एक व जास्तीत जास्त आठ मत देऊ शकतात, उपाध्यक्ष पदासाठी कमीत कमी एक मत व जास्तीत दोन मत देऊ शकतात, तसेच अध्यक्ष व ट्रस्टी या पदासाठी एक मत द्यावयाचे असे फलक ठिकठिकाणी लावण्यात यावे जेणेकरून सभासद जुन्या पद्धतीने मतदान करणार नाहीत.त्रिवर्षीय निवडणूक असल्यामुळे व सभासदांनी उमेदवारांना तीन वर्षासाठी निवडून देत आहे. सभासदांचा अधिकार भंग होणार नाही म्हणून नवीन उमेदवार तीन वर्षापेक्षा जास्त काळ ते या पदावरती राहू शकत नाही अशी सूचना त्यांना देऊन याबाबत प्रत्येक उमेदवाराकडून स्वयंघोषणापत्र घेण्यात यावे. जेणेकरून पुढची निवडणूक वेळेवर लागेल.
वरील तिन्ही मुद्द्यांवर आपण कायदेशीर विचार करून योग्य निर्णय घेण्यात यावा अशी विनंती आकाश माहेश्वरी यांनी केली आहे.




