अमळनेर : दोन मोटरसायकलची समोरासमोर टक्कर होऊन चोपडा तालुक्यातील घुमावल येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना १२ रोजी दुपारी १२ वाजता तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ घडली.
नरेंद्र प्रेमराज पाटील रा घुमावल ता चोपडा हा आपली मोटरसायकल क्रमांक एम एच १९ बी ए ७९८६ वर अमळनेर येथे पैलाड भागातील राजेंद्र पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला आला होता. सकाळी साडे अकरा वाजेला तो भेटून चोपडा येथे काम असल्याने परत चोपडा कडे जाण्यासाठी निघाला असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास चोपडा कडून अमळनेर येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच १९ ई सी २२१३ हिच्याशी समोरासमोर धडक झाल्याने दोन्हीही खाली पडले. नरेंद्र जागीच ठार झाला होता तर समोरील अज्ञात चालक गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने वाहनात घालून पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना केले. नरेंद्र याचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमळनेर पोलीस स्टेशनला नरेंद्र याचा चुलत भाऊ किशोर मोहन पाटील याने फिर्याद दिल्यावरून अज्ञात मोटरसायकलस्वार विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ),१२५(ब),३२४(४) ,मोटरवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

