
अमळनेर:- येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीतील विविध पदांसाठी १३ रोजी १८ अर्ज दाखल झाले असून ४८ अर्जांची विक्री झाली आहे.
खानदेश शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष (१),उपाध्यक्ष (२),विश्वस्त (१) तर कार्यकारी संचालक पदाचे (८) अशा १२ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून नामांकन दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी १३ रोजी १८ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.
अध्यक्षपदासाठी विनोद अग्रवाल,उपाध्यक्ष पदासाठी सचिन पाटील,कमल कोचर,माधुरी पाटील,नगीनचंद लोढा,विश्वस्त पदासाठी वसुंधरा लांडगे,नगीनचंद लोढा यांनी अर्ज दाखल केले असून संचालक पदासाठी निशांत अग्रवाल,योगेश मुंदडे,पंकज मुंदडे,कल्याण पाटील, कमल कोचर,हरी भिका वाणी, जितेंद्र जैन,डॉ. अनिल शिंदे,प्रदीप अग्रवाल,नीरज अग्रवाल,डॉ.संदेश गुजराथी यांनी अर्ज दाखल केले आहेत.
निवडणूक उपसमितीचे चेअरमन पंडित चौधरी,सदस्य विवेकानंद भांडारकर,मनोहर महाजन, प्रा. डॉ.सुनील गरुड तसेच खानदेश शिक्षण मंडळाचे सचिव पराग पाटील,राकेश निळे,भटू चौधरी यांनी कामकाज पाहिले.




