
अमळनेर : तालुक्यातील गांधली येथील तरुणीच्या मृत्यू प्रकरणी तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांधली येथील जयश्री संजय संदानशीव वय १८ वर्षे १ महिना ही १० रोजी दुपारी ४ वाजता घरातून काहीही न सांगता निघून गेली होती. नातेवाईकांकडे शोध घेतल्या नंतर देखील तिचा शोध लागला नव्हता. १२ रोजी दुपारी १२ वाजता तिचा मृतदेह गांधली शिवारातील धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला होता. मुलीच्या वडिलांना माहिती मिळाली की, मुलीचे आणि गावातील विजय उर्फ राज विलास बागुल (भिल) याच्याशी होते. आणि यापूर्वी देखील मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. विजय उर्फ राज याने मानसिक त्रास दिल्याने तिला नैराश्य आले होते. मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार दिल्याने त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.




