
अमळनेर:- तालुक्यातील धार येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत हिवाळी क्रीडा स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे उद्घाटन तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी प्रमोद पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अल्ताफ शेख (ग्रामीण अहिराणी सोशल मीडिया कलाकार) तसेच अंतुर्ली केंद्राचे केंद्रप्रमुख किरण शिसोदे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा, शिस्त व आरोग्याचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामविकास अधिकारी वासुदेव मारवडकर यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या सहकार्यामुळे शाळेच्या उपक्रमांना नेहमीच पाठबळ मिळत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नयना शिंदे यांनी केले. त्यांना सहकारी शिक्षिका शीतल पाटील व विकास सोनवणे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
—




