
अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव , पारोळा व चोपडा तालुक्यातील होमगार्डचे तिमाही संमेलन अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होमगार्ड चे जिल्हा समदेशक अशोक नखाते होते.
यावेळी शिस्त ,सुरक्षा , आपत्कालीन परिस्थिती आणि प्रतिसाद आदी विषयांवर चर्चा झाली. तसेच दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दिशा आणि मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम ,कंपनी कमांडर अरुण नेरकर , प्रशासकीय अधिकारी रामनाथ काळे , केंद्र प्रमुख गंगाधर महाजन , सामुग्री प्रबंधक सुभेदार मदन रावते , वरिष्ठ लिपिक पंकज नेरकर , तसेच अमळनेर प्रभारी समदेशक अधिकारी गोपाळ पाटील , पारोळा प्रभारी समादेशक अधिकारी अरुण पाटील , चोपड्याचे साजिद सैय्यद शेख , संजीव सोनवणे , धरणगाव चे प्रभारी समदेशक अधिकारी ईश्वर महाजन पलटण नायक ईश्वर पाटील , हजर होते.
कार्यक्रमास सिद्धांत शिसोदे , नितीन कापडणे, प्रशांत पाटील , मयाराम पाटील , भीमराव संदानशीव ,कैलास पाटील , दिनेश साळुंखे , दत्तात्रय पाटील ,आत्माराम चौधरी , लिपिक संजय पाटील यांचे सहकार्य लाभले. चेतन राजपूत यांनी संमेलनासाठी नाट्यगृह मोफत उपलब्ध करून दिले.




